Lokmat Internatinol News | भारत नेपाळ सीमेवर सापडले हेरगिरी करणारे गरुड | Lokmat News

2021-09-13 185

स्थानिक लोकांना थकलेल्या अवस्थेत एक गरुड दिसले. या गरुडाला ताब्यात घेतल्यानंतर तपासणी करण्यात आली. गरुडाची प्रकृती खराब असल्याचे समजल्यानंतर त्याला रौतहट जिल्हा वन कार्यालयाकडे सोपवण्यात आले. या गरुडाच्या पायात आढळलेल्या अंगठीवर ऑक्झिनीथ.लॅब.एनएसटी.बोयोल.मंगोलिया २७१ लिहिलेले आढळले आहे. अंगठी आणि सोलर प्लेट आढळून आल्याने या गरुडाचा वापर हेरगिरीसाठी होत असल्याचा अंदाजआहे. गरुडाच्या पायातील अंगठीत एक रेडियो ट्रांसमीटर लावलेले आहे. अशी माहिती मिळताच भारत आणि नेपाळचा गुप्तचर विभाग सतर्क झाला आहे.नेपाळ आणि भारतामध्ये हेरगिरी करण्याच्या उद्देशाने चीन शेजारील देश मंगोलियात आढळणा-या गरुडांचा वापर करत आहे.हे गरुड गोमायु प्रजातीचे आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Free Traffic Exchange

Videos similaires